कासेगाव येथे महावितरण च्या भोंगळ कारभारामुळे एकाचे झाले दीड लाखाचे नुकसान
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथील मातंग वस्ती ते माळी गल्ली कडे जाणारा रस्तावरती दोन म्हशींना विद्युत पुरवठा चे करंट लागला यात तुकाराम सुदर्शन खारे यांच्या एका म्हशीचा जागीच मृत्यू तर एक एक म्हैस गंभीर जखमी झाली यात तुकाराम सुदर्शन खारे यांचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येतात.
जिल्ह्याचा दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये जोरदार अवकाळी पावसामुळे अनेक विद्युत खांबे तसेच काही भागांमध्ये विद्युत तारा तुटल्यामुळे असे अपघात होत आहेत.
कासेगाव ला उळ सब स्टेशन मधून विद्युत पुरवठा होत असतो.
परंतु नेहमीच कासेगाव मधील मातंग वस्ती असो दलित वस्ती असो किंवा गावातील काही भागांमध्ये नेहमी लाईट ही बत्ती गुल असते.
यातच मुळे महावितरण अंतर्गत सब स्टेशन मधून अशा भोंगळ कारभारामुळे आणि उळे सब स्टेशन च्या कारभारामुळे कासेगाव येथील नागरीका मधुन नाराजी व्यक्त होत आहे.
सदर घटनेचा तात्काळ पंचनामा करून नुकसान ग्रस्त तुकाराम सुदर्शन खारे यांना शासकीय मदत मिळावी अशी कासेगाव येथील ग्रामस्थांकडून मागणी केली जात आहे.
Leave a Reply