रूपाली चाकणकरांविरोधात पुण्यात गुलाबो गॅंग आक्रमक
थील्लर पे चिल्लर रूपाली चाकणकरांच्या फोटोवर चिल्लर उधळत पुण्यात गुलाबो गॅंगचे आंदोलन. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर सर्वच ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले. सर्व स्तरातून महिला देखील आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या. आज पुण्यामध्ये बिटिया फाउंडेशन गुलाबो गॅंग कडून महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या फोटोवर चिल्लर फेकत चाकणकरांच्या राजीनामाची मागणी करण्यात आली. त्याचबरोबर अजित पवारांनी लवकरात लवकर चाकणकरांचा राजीनामा नाही घेतला तर आम्ही साखळी आंदोलन करू असा इशारा देखील या महिलांकडून देण्यात आला. पुण्यातील गुडळक चौकात संगीता तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन करण्यात आले.
Leave a Reply