दक्षिण सोलापूर जैना शिरवळ येथील श्री अमोगसिध्द यात्रेस भाविकांची मोठी गर्दी
दक्षिण सोलापूर तालुक्यातील जैना शिरवळ चे ग्रामदैवत श्री अमोगसिध्द महाराज यात्रेस 26मे 2025 पासून सुरूवात झाली.
सायंकाळी चार वाजता सुमारास भव्य दिव्य पालखीचे भेटी संपन्न झाला यात आचेगावचे शिलीसिध्द महाराज मातोळी सिध्दापुरचे ओगसिध्द महाराज आणि भुताळसिध्द महाराज मंद्रूप चे मलगारसिध्द महाराज कुंभारीचे गेनसिध्द महाराज कणबसचे प्रभुलिंग महाराज जैना.शिरवळचे अमोगसिध्द महाराज आणि इतर गावांतील देवाच्या पालखीचे भेटी संपन्न झाला
रात्री 8वाजता नंदी ध्वज आणि आलेल्या सर्व पालख्यांचे मिरवणूक काढण्यात आली
27मे 2025रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे
सायंकाळी 4वाजता जैना शिरवळ चे सोमलिंग महाराज यांच्या माणुसकीचे ही कार्यक्रम संपन्न होणार आहे
28मे 2025रोजी दिवसभर कलगीतुरा चे कार्यक्रमाचे आयोजन ही करण्यात आले असुन सायंकाळी 4वाजता 100रूपये पासून 5हजार 1रूपये पर्यंतच्या कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे
त्यानंतर रात्री 10वाजण्याच्या सुमारास जैतापूर शिरवळ चे अमोगसिध्द नाट्यमंडळ मगा होदरू मांगल्य बेकु अर्थात हेतवळु हालु विषवायतु कन्नड नाटकाने यात्रेची सांगता होणार आहे
ही यात्रा यशस्वी होण्यासाठी श्री अमोगसिध्द यात्रा कमिटी जैना शिरवळ तसेच समस्त ग्रामस्थ मंडळ जैन शिरवळ यांचे विशेष सहकार्य लाभले.
या यात्रेस वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वळसंग पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.
Leave a Reply