केगाव ते हत्तुर राष्ट्रीय महामार्गावर कवठे ब्रिजवर एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
या अपघातात एका 17 वर्षीय तरुणाचा ट्रकच्या चाकाखाली आल्याने जागेवरच मृत्यू झाला.
सदर हा अपघात इतका भीषण होता की सदर त्या तरुणाच्या तोंडावर व मानेवरून हा ट्रकचा चाक गेला.
नैतिक राम माने वय वर्ष 17 राहणार कवठे तालुका उत्तर सोलापूर असे या अपघातात मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की दिनांक 26 मे 2025 रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास केगाव ते हत्तुर जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील कवठे ब्रिजवर भरधाव येणाऱ्या ट्रकने जोराची धडक दिली. आणि नैतिक हा ट्रकच्या चाकाखाली आला. आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
सदर घटनेची माहिती मिळताच सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल डी आर वाल्मिकी नेमणूक सलगर वस्ती पोलीस ठाणे सोलापूर यांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर तरुणास सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिविल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केले असता उपचारा पूर्वी मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
नैतिक हा शेळ्या राखण्याचं काम करत होता आणि तो आपल्या शेळ्या घेऊन त्या ठिकाणावरून जात होता इतक्यातच हा भीषण अपघात घडला.
याबाबत अधिक माहिती माझी सरपंच आणि नैतिक च्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना दिली.
Leave a Reply