दलित वस्ती निधी संदर्भात चौकशी नेमलेले अधिकारी त्वरित बदलून कारवाईची मागणी
अन्यथा पंधरा दिवसाच्या आत स्थगित केलेले उपोषण परत चालू करणार आर बी दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने देण्यात आला महापालिकांच्या आयुक्तांना इशारा
सोलापूर शहरातील प्रभाग क्र. 1 ते 26 या प्रभागामध्ये प्रशासकीय मान्यता सन 2021 ते 2024 या कालावधीमध्ये कोट्यावधी रुपये या कामाचे मक्ता (टेंडर) काढण्यात आले आहे व यामध्ये एक ते नऊ योजना असून कोट्यावधी रुपयाची फसवणूक अधिकारी व ठेकेदार यांच्याकडून करण्यात आले आहे.
या संदर्भात आमच्या संस्थेच्या वतीने दिनांक:- 21/03/2025 ते दिनांक:- 26/3/2025 रोजी पर्यंत अमर उपोषण करण्यात आले होते. व आपल्या लेकी म्हणण्यानुसार आम्ही आमचे उपोषण स्थगित केले होते. व आपण दिलेल्या आश्वासनुसार व आपल्याकडून चौकशी अधिकारी नेमलेले योग्य ती कारवाई करताना दिसून येत नाही. तरी ते अधिकारी बदलण्यात यावे व पंधरा दिवसाच्या आत. योग्य ती कारवाई करण्यात आली नाही तर आमच्या संस्थेच्या वतीने अमरन उपोषण चालू करणार असा इशारा आर बी दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विश्वभूषण कांबळे यांनी महापालिकेच्या आयुक्तांना निवेदन देऊन इशारा दिला आहे यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
Leave a Reply