५४ मीटर रस्त्याचा मार्ग मोकळा सोलापूर विकास मंचच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश; ऐतिहासिक दगडी पुलाच्या पाडकामाआधी पर्यायी मार्ग तयार होणार

५४ मीटर रस्त्याचा मार्ग मोकळा सोलापूर विकास मंचच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश; ऐतिहासिक दगडी पुलाच्या पाडकामाआधी पर्यायी मार्ग तयार होणार

सोलापूर – छत्रपती संभाजी महाराज चौक ते सीएनएस हॉस्पिटल दरम्यानच्या ५४ मीटर रस्त्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. दमाणी नगर येथील १०३ वर्षें जुना दगडी रेल्वे पुल लवकरच रेल्वे प्रशासन आणि NHAI मार्फत पाडण्यात येणार असून, त्यानंतर उद्भवणाऱ्या गंभीर ट्राफिक समस्येचा पर्याय म्हणून हा रस्ता महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

या मार्गासाठी सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी गेले चार वर्षे सातत्यपूर्ण व अभ्यासपूर्ण पाठपुरावा करून सोलापूर महापालिका प्रशासन व तत्कालीन पालकमंत्री यांचे लक्ष वेधले. मिलिंद भोसले, योगिन गुर्जर, केतन शहा, विजय कुंदन जाधव, अॅड. दत्तात्रय अंबुरे आणि मनोज क्षिरसागर यांनी महापालिका अधिकारी व तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत अनेक बैठका घेतल्या. त्यानंतर या रस्त्यासाठी DPDC अंतर्गत भरघोस निधीची तरतूद करण्यात आली.

या मार्गातील अडथळा असलेल्या देशमुख पाटील वस्तीतील अनधिकृत १८ घरांवर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई केली. त्यामुळे आता हा रस्ता रहदारीसाठी लवकरच खुला होणार आहे. सोलापूर विकास मंचच्या या महत्त्वपूर्ण भूमिकेमुळे संपूर्ण शहराला दिलासा मिळणार आहे. आता मंचचे लक्ष सीएनएस हॉस्पिटल ते विजापूर रोड मार्ग पूर्ण करून संपूर्ण रिंगरोड विकसित करण्यावर आहे.

सोलापूर विकास मंचने सोलापूरकरांच्या वतीने आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदिप कारंजे, नगर अभियंता सारिका अकुलवार, सहायक अभियंता प्रकाश दिवाणजी यांच्यासह तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले.

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *