तेलगांव येथे श्रीशिवराज्यभिषेक दिन उत्साहात साजरा..
विधाताच्या 120 रक्तदानाने 1100 पिशव्यांचे संकलन पूर्ण..
तेलगाव येथे 352 वा शिवराज्याभिषेक दिन व विधाता बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या 12 व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व दहावी,बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात 120 रक्तदात्यांनी रक्तदान करून संस्थेने आता पर्यंत 1100 पिशव्यांचे संकलन केले.सदर कार्यक्रमास बी एम पी कॉलेजचे अध्यक्ष सन्माननीय पृथ्वीराज माने,राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर,राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश युवक सचिव महेश कुलकर्णी, राष्ट्रीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सिताराम जाधव व शिवव्याख्याते माऊली भाऊ जाधव , छत्रपती ग्रुप चे अध्यक्ष मनोज भाऊ शिंदे उपस्थित होते. सुरुवातीला पृथ्वीराज माने यांच्या हस्ते भगव्या स्वराज्य ध्वजाचे पूजन करण्यात आले,त्यानंतर प्रशांत बाबर यांच्या हस्ते शिवरायांनी जलाभिषेक व दुग्धाभिषेक घालून विधिवत अभिषेक करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष पृथ्वीराज माने यांनी संस्थेच्या तपपूर्तीचे भरभरून कौतुक केले संस्थेच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. त्यानंतर शिवव्याख्याते माऊली जाधव यांच्या व्याख्यानरुपी भाषणाने अंगावर काटा आणणारा अनुभव आला.माननीय प्रशांत बाबर यांनी आम्ही सदैव संस्थेसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले संस्थेच्या वतीने मा.बाळासाहेब माने यांनी सर्व मान्यवरांच्या आभार मानले कार्यक्रमाला उत्तर सोलापूर तालुक्याचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे पोलीस उपनिरीक्षक बनसोडे हे वेळात वेळ काढून उपस्थित राहिले संस्थेच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला व रक्तदानाचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थेचे ज्येष्ठ सदस्य चंद्रसेन पाटील यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयानंद पाटील यांनी केले..
कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते..
Leave a Reply