भारतीय जैन संघटनेच्या महिलांनी साजरा केला “विश्व पर्यावरण दिवस”

भारतीय जैन संघटनेच्या महिलांनी साजरा केला “विश्व पर्यावरण दिवस”

पर्यावरण संवर्धन,
हा भारतीय जैन संघटनेच्या पायाभरणी कार्यक्रमांच्या मालिकेतील सहावा पायाभरणी कार्यक्रम आहे. या मालिकेत विश्व पर्यावरण दिनानिमित्त 05 जून 2025 रोजी भारतीय जैन संघटना महिला जिल्हा विभाग सोलापूर द्वारा वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनाच्या विषयावर एका तासाचे सेमिनारच्या कार्यक्रमाचे संत गाडगेबाबा प्राथमिक आणि माध्यमिक आश्रम शाळा, आनंद नगर कवठे येते यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या पटांगणा भोवती वड, पिंपळ, बकुळा, कडुलिंब अशा देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले तसेच शाळेला डस्टबिन भेट म्हणून देण्यात आले. सेमिनारच्या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेला वंदन, दीप प्रज्वलनाने केले आणि नवकार महामंत्र सौ.प्रविणाताई सोलंकी यांनी म्हटले. कार्यक्रमाचे वक्ते प्राध्यापिका वसुंधरा शर्मा मॅडम तोगराळी यांनी आपल्या वक्तव्यात विज्ञानाची जसजशी प्रगती होऊ लागली तसतशी मानवाची सुखाची लालसा वाढू लागली, रस्ते हवेत नगरे हवेत म्हणून केलेली जंगलतोड, जमिनीचा कस वाढावा म्हणून रासायनिक खतांचा केलेला अंदाधुंद वापर, वाढते औद्योगीकरण आणि ते करताना पर्यावरणाची केलेलेनुकसान हे मानवाने केलेले मोठे गुन्हे आहेत. आपण पर्यावरणाचे कशा पद्धतीने नुकसान करत आहोत आणि त्याचे कोणते दुष्परिणाम आपल्याला भविष्यात भोगावे लागणार आहेत त्यासाठी आपण पर्यावरणाची कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे हे आपल्या रोजच्या जीवनातील छोटे छोटे उदाहरण देऊन उत्तम पद्धतीने सांगितले. राज्य सचिव संतोष बंब यांनी सुद्धा पर्यावरण संवर्धन या विषयावर आपले मत व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी हिरव्या रंगाचा ड्रेस कोड ठेवण्यात आले. उपस्थित सर्व सदस्यांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली.
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री केतन भाई शहा यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमात राज्य सचिव सौ. संतोष बंब, विभागीय अध्यक्षा सौ. माया पाटील, जिल्हाध्यक्षा सौ.प्रविणा सोलंकी, सौ संतोष लुनावत सौ.निर्मला मेहता, कल्पना भन्साळी, मिनल जैन, ऐश्वर्या कस्तुरे, वर्षा जैन, लक्ष्मी पाटील व इतर सर्व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. तसेच कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन जिल्हाध्यक्षा सौ. प्रविणा सोलंकी यांनी केले.

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *