सोलापूरातून नागरी विमानसेवा सुरू होत आहे याची समस्त सोलापूरकरां मधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.”
देश स्वतंत्र झाल्यानंतर सोलापूरातील सर्वात मोठा संवैधानिक मार्गाने सामान्य माणसाने दिलेला लढ्याचे परिपाक म्हणून ९ जुन सोमवार पासून सोलापूर गोवा ही विमानसेवा सुरू होत आहे.
लढा उभारणारे सोलापूर विकास मंचच्या अनेक सदस्यांनी गोव्यावरुन येताना व सोलापूर हुन गोव्याला जातानाचे तिकीट काढले आहे.
पहिल्या विमानातून येणाऱ्या प्रवाश्यांच्या स्वागतार्ह मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस, केंद्रीय उड्डायन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ,पालक मंत्री जयकुमार गोरे हे सर्व मान्यवर होटगी रोड विमानतळावर उपस्थित राहणार आहेत , सोलापूर विकास मंच सदस्य व इतर मान्यवर ह्यांनी सुद्धा तिकीट घेऊन प्रवास करणार आहेत.
पहिल्या विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सोलापूरातील अनेक उद्योजक व्यवसायिक यांनी विविध भेटवस्तू देण्याची तयारी केली आहे.
भेटवस्तू देणार्यां मध्ये प्रामुख्याने
1) नट्स मिठाई नमकीन व कॅटरिंग चे भावेश शहा,हे रिफ्रेशमेन्ट पॅकेट देणार आहेत, ….
2) न्यू बॉम्बे बेकरी अँड केक गॅलरी तर्फे सर्वाना केक देणार आहेत,
3) अन्नपूर्णा टेक्सताईल्स तर्फे प्रमोद व अंकित दरगड हे सोलापूरचे प्रसिद्ध टर्किश नेपकीन ,आय लव्ह सोलापूर असे लिहून देणार आहेत
4) क्लासिक फूड्स तर्फे दिवीत हितेंद्र शहा हे सोलापूरची प्रीमयम औथांटीक शेंगा चटणी देणार आहेत,
5) बी-गलीम प्रो-क्लीन सोल्युशन्स तर्फे विनय व अनुजा मोडक हे सॅनिटाईझर व फ्रेशनर देणार आहेत,,
वरील सर्व भेट वस्तू ह्या पहिल्या विमानातून येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाश्याना सोलापूरची आठवण म्हणून देण्यात येणार आहेत,,
सोलापूर विकास मंच ने सर्वाना आव्हान केलें होते लगेचच वरील सर्व उद्योजक व व्यावसायिक यांनी आपल्या भेट वस्तू विना मूल्य देण्याची संमती दर्शविली,,
विकास मंच सर्वांचे आभार मानत आहे.
Leave a Reply