डेडिकेटेड टू कॉमन मॅन !

डेडिकेटेड टू कॉमन मॅन !

शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री एकनाथजी शिंदे साहेब शुक्रवारी मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आले होते. तिथून मुंबईकडे परतत असताना विमानतळावर आल्यानंतर त्यांच्या उड्डाणाला थोडा विलंब झाला. मात्र हाच विलंब एका मायभगिनीसाठी जीवनदान देणारा ठरला आहे.

जळगाव जिल्ह्यातील शीतलताई पाटील या किडनी विकाराने त्रस्त असलेल्या भगिनी किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेसाठीच विमानाने पतीसह मुंबईकडे निघाल्या होत्या. मात्र त्यांचे विमान चुकले. ही बाब मंत्री मा. गिरीश महाजन यांनी शिंदे साहेबांच्या निदर्शनास आणून दिली. शिंदे साहेबांनी तात्काळ होकार दिला आणि या भगिनीला आणि तिच्या पतीला आपल्या चार्टर्ड विमानातून मुंबईला आणले.

यावेळी प्रवासात शिंदे साहेबांनी त्यांची आस्थेने चौकशीही केली. इतकेच नाही तर मुंबईत आल्यावर त्यांच्यासाठी विशेष रुग्णवाहिका उपलब्ध करून देत या भगिनीला रुग्णालयातही दाखल केले. यावेळी त्यांनी साहेबांचे आभारही मानले. शिंदे साहेब जर मदतीला धावून आले नसते तर या भगिनीची शस्त्रक्रिया वेळेत होऊ शकली नसती. एक भाऊ जसा आपल्या बहिणीच्या मदतीसाठी धावून जातो, अगदी तसंच शिंदे साहेब आपल्या बहिणीच्या मदतीला धावून गेले आणि या बहिणीसाठी देवदूत ठरले.

खरं तर मातीशी जुळलेलं नातं आणि माणुसकीचं बाळकडू अशा दुहेरी गुणांचं अनोखं मिश्रण शिंदे साहेबांच्या व्यक्तिमत्वात आहे. त्यामुळेच ते सदैव प्रत्येकाच्या मदतीसाठी तत्पर असतात, याची प्रचिती पुन्हा एकदा अवघ्या महाराष्ट्राला आलीच. पण शिंदे साहेब आजही ‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन’ आहेत, हेही पुन्हा अधोरेखित झाले.

 

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *