अजित पवार गटाच्या कार्यकर्त्याचा मृतदेह स्वतःच्या कारमध्ये आढळला, आत्महत्येचा संशय, कारण अस्पष्ट

अजित पवार गटाच्या कार्यकर्त्याचा मृतदेह स्वतःच्या कारमध्ये आढळला, आत्महत्येचा संशय, कारण अस्पष्ट


राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गटाचा सरचिटणीस ओंकार महादेव हजारे (वय-३२, रा. पापय्या तालीम परिसर, मुरारजी पेठ, सोलापूर) याचा मृतदेह रविवारी रात्री त्याच्या घरासमोरील कारमध्ये पोलिसांना आढळला. त्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे.

रविवारी दुपारी तो कारमध्ये बसला. त्यानंतर तो बाहेरच आला नाही. घरच्यांनी आणि शेजाऱ्यांनी कारच्या दरवाजातून डोकावून पाहिले असता तो सीटवर निपचित पडला होता. कारचा दरवाजा तोडून बेशुद्धावस्थेत त्याला बाहेर काढले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

ओंकार हजारे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा सरचिटणीस असून पार्थ पवार यांचा विश्वासू आणि निकटवर्तीय म्हणून सोलापूर शहर जिल्ह्यात त्याची ओळख होती. त्याने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम केले. त्याच्या जाण्याने त्याच्या मित्रपरिवारातून दुःख व्यक्त होत आहे.

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *