सोलापूर शहरातील कर्णिक नगर परिसरात एका तरुण तरुणीने एकत्र एका घराच्या हॉलमध्ये लोखंडी हुकला ओढणीच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केली.
ही घटना 19 जून 2025 रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
दोघांची नावे समोर आली असून त्या तरुणाचे नाव रोहित भिमु ठणकेदार वय वर्ष 23 राहणार शांतीनगर मढी वस्ती सोलापूर व तरुणीचे नाव अश्विनी वीरेश केशापुरे वय वर्ष 23 राहणार बागलकोट कर्नाटक असे आहे.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले व दोन्ही मृतदेह सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिविल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच दोघांचे नातेवाईकांनी सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी एकच गर्दी केली.
सदर घटनास्थळी चिठ्ठी देखील मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या घटनेचा अधिक तपास पोलीस करत असून या मागचे नेमके कारण काय याचा शोध आता पोलीस करणार हे मात्र नक्की.
याबाबत अधिक माहिती दोघांच्या नातेवाईकांनी माध्यमांशी बोलताना दिली.
Leave a Reply