निरा नदीत वाहून गेलेल्या जालन्याच्या युवकाचा मृतदेह 36 तासांनी सापडला
आदिवासी कोळी रेस्क्यू टीमने घेतले परिश्रम : फोके कुटुंबीयांना मृतदेह सोपवे
सोलापूर : आंघोळीसाठी निरा नदीत
उतरलेल्या जालन्याचा युवक गोविंद फोके (२०, रा. ता. अंबड) याचा मंगळवारी सकाळी पाण्यात बुडून मृत्यू झाला. नदीच्या प्रवाहासोबत मृतदेह वाहून गेल्याने एनडीआरएफ कडून मृतदेह शोधण्याचे काम सुरू झाले. मृतदेह सापडत नसल्याने पंढरपूर येथील आदिवासी कोळी रेस्क्यू टीमचीही मदत घेण्यात आली. अखेर ३६ तासानंतर रेस्क्यू टीमला मृतदेह सापडला.
बुधवारी चार दरम्यान अकलूजकडच्या दोन किलोमीटर लांब नीरा नदीत मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला. मृतदेह सराटी नदीकिनारी आणून फोके कुटुंबीयांना सोपवण्यात आला.
पंढरपूरच्या आदिवासी रेस्क्यूमध्ये विठ्ठल अधटराव, गणेश कोळी, ओंकार संगीतराव, शुभम कोताळकर, सचिन नेहतराव, महेश परचंडे, साहिल माने, युवराज कांबळे, संकेत कोरे, सुहास साळुंखे, अभिजित अधटराव, आदेश परचंडे, विक्रम कांबळे, संकेत कांबळे, सुमित आधटराव, शुभम शिंदे आदींचा वे समावेश आहे.
Leave a Reply