विशेष पोलीस महानिरीक्षक अंकुश शिंदे यांच्या स्वेच्छा निवृत्ती अर्जावरून खळबळ
पोलीस दलात अतिशय कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय, प्रसंगी कठोर निर्णय घेणारे अनुभवी पोलीस अधिकारी म्हणून आपली ओळख जपलेल्या शिंदे यांनी नियमीत निवृत्तीला अवघे ३ ते ४ महिने शिल्लक राहिलेले आहे.
| नागपूर : महाराष्ट्र पोलिसांच्या राज्य गुप्तवार्ता (अती महत्त्वाच्या व्यक्ती सुरक्षा) विभागात विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले अंकुश शिंदे यांनी अलिकडेच स्वेच्छा निवृत्तीसाठी पोलीस दलाकडे अर्ज केला आहे. यशस्वी कारकिर्दीनंतर आपल्या नियमित निवृत्तीला अवघे ३ ते ४ महिने शिल्लक राहिलेले असताना शिंदे यांनी हे पाऊल का उचलले, या मागचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. तर दुसरीकडे त्यांच्या स्वेच्छा निवृत्ती अर्जावर पोलीस विभागाने देखील अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे राज्यातील पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
भारतीय पोलीस सेवेतील २००३ च्या बॅचचे अधिकारी असलेले अंकूश शिंदे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजूरा येथे १९९२ ते ९४ या कालावधीत उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून रुजू झाले. याकाळात नक्षलवादाने होरपळत असलेले गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्हे त्यांनी जवळून अनुभवले. तेव्हा पासून शिंदे यांनी नक्षलवादी कारवायांविरोधात आपली पकड मजबूत केली होती. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत नाशिक ग्रामीणचे अधीक्षक राहिलेले शिंदे यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त म्हणूनही समर्थपणे कर्तव्य बजावले आहे. रायगड आणि सोलापूर येथेही यशस्वीपणे कर्तव्य बजावले आहे. राज्य गुप्तवार्ता (व्हीआयपी सुरक्षा) विभागात विशेष पोलिस महानिरीक्षपदावर नियुक्त होण्यापूर्वी शिंदे हे नाशिक शहराचे पोलीस आयुक्त देखील होते.
या संपूर्ण कारकिर्दीत कर्तव्यदक्ष अशी ओळख असलेल्या शिंदे यांना राष्ट्रपती पोलीस पदकानेही सन्मानित करण्यात आले आहे. पोलीस दलात अतिशय कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय, प्रसंगी कठोर निर्णय घेणारे अनुभवी पोलीस अधिकारी म्हणून आपली ओळख जपलेल्या शिंदे यांनी नियमीत निवृत्तीला अवघे ३ ते ४ महिने शिल्लक राहिलेले आहे. असताना स्वेच्छा निवृत्तीचा स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज करताना शिंदे यांनी शासकीय सेवेचा कालावधी पूर्ण केल्याचे सांगत स्वेच्छा निवृत्तीला मंजुरी करण्याची विनंती केली आहे. त्यांनी या अर्जात दिलेले अपरिहार्य कारण मात्र गुलदस्त्यात आहे. स्वेच्छा निवृत्ती अर्जा संदर्भात प्रतिक्रिया घेण्यासाठी लोकसत्ताने संपर्क साधला असता, शिंदे यांनी या विषयावर बोलण्यास स्पष्टपणे नकार दिला.नक्षलवाद मुक्तीची सुरवात शिंदे यांच्यामुळे राज्य पोलीस दलात महानिरीक्षक पदावर कार्यरत असताना अंकुश शिंदे यांनी राज्यातल्या गडचिरोली सारख्या नक्षल प्रभावित जिल्ह्यात नक्षलवादा विरोधातल्या मोहिमांना अधिक बळकट केले. ज्या अर्थाने आज राज्याची नक्षलवादातून मुक्ती
होत आहे, त्यात शिंदे यांचा वाटा मोलाचा राहिला आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. नक्षलवाद मुक्तीची खऱ्या अर्थाने सुरुवात त्यांच्याच यशस्वी कार्यकाळापासून झाली होती, असे म्हटले तरी वावगे ठरत नाही.
Leave a Reply