Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर ! जूनच्या हप्त्याविषयी आदिती तटकरे म्हणाल्या, “पात्र लाभार्थ्यांच्या आधार.”
मुंबई: महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. दरम्यान राज्यातील लाडक्या बहीणींसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबत लाडक्या बहीणींना उत्सुकता होती.
दरम्यान आता याबाबत आता सरकारने माहिती दिली आहे. जून महिन्याचा हप्ता देण्याबाबत प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
काय म्हणाल्या बालविकास मंत्री अदिती तटकरे ?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : जून महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंकड् बैंक खात्यात उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे.
महायुती सरकारचा दृढ निश्चय, माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री श्री.
अजितदादा पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे.
इन्कम टॅक्स विभागाशी सामंजस्य करार होणार
‘लाडकी बहीण’ योजनेच्या अर्जांची काटेकोर पडताळणी सुरू झाली असून अपात्र लाभार्थ्यांचा शोध घेण्यासाठी राज्य सरकारने हालचाली गतीमान केल्या आहेत. याअंतर्गत प्राप्तिकर विभागाकडे अहवाल मागवण्यात आला होता. मात्र, तो अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्याने आता राज्य सरकार आणि इन्कम टॅक्स विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे.
Ladki Bahin Yojna: ‘लाडकी बहीण’ योजनेत महत्त्वाची अपडेट; इन्कम टॅक्स विभागाशी सामंजस्य करार होणार
‘लाडकी बहीण’ योजनेतील अपात्र लाभार्थ्यांचा शोध घेण्यासाठी राज्य सरकारने हालचाली वेगात सुरू केल्या आहेत. प्राप्तिकर विभागाकडे याआधीच संबंधित माहितीचा अहवाल मागवण्यात आला होता. मात्र, तो अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्याने आता सरकार आणि इन्कम टॅक्स विभाग यांच्यात लवकरच सामंजस्य करार करण्यात येणार आहे. मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर लवकरच शिक्कामोर्तब होणार आहे. ‘लाडक्या बहिणींशी संबंधित माहितीची गोपनीयता राखण्यासाठी हा करार केला जाणार आहे.
सरकारसाठी ‘लाडकी बहीण योजना आर्थिकदृष्ट्या डोईजड ठरू लागली आहे, हे सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांनी अप्रत्यक्षपणे मान्य केले आहे. या योजनेवर खर्च होणाऱ्या मोठ्या निधीमुळे राज्याच्या इतर विकासकामांवर परिणाम झाल्याचे स्पष्ट होत आहे. शिंदे गटातील काही मंत्रीही याबाबत खुलेपणाने मत व्यक्त करत आहेत.
Leave a Reply