७० फूट भाजी मंडई विक्रेत्यांच्या प्रश्नी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनाची अंमलबजावणी करा.
विक्रेते आक्रमक व अभिनव आंदोलन
सोलापूर, दि. :- ७० फुट भाजी मंडई येथील भाजीपाला, फळ विक्रेते, फेरीवाले यांच्या उदरनिर्वाहावर संक्रात आली असून तब्बल ३० दिवसापासून व्यवसाय बंद आहे. याबाबत मा. पालकमंत्री, मा. आयुक्त सोमपा. यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली व मोर्चाही काढण्यात आला. मात्र अद्याप विक्रेत्यांचा प्रश्न मार्गी न लागल्याने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांना सोलापूर विमानतळ येथे भेटून ७० फुट भाजी मंडई येथील विक्रेत्यांची कैफियत सांगण्यात आली. त्यानंतर या वस्तुस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट आश्वासन दिले की, ७० फूट भाजी मंडई येथील विक्रेते सध्या ज्या ठिकाणी आपला व्यवसाय करीत आहेत, त्या जागेवरच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीनंतर स्थापन होणाऱ्या महापौर व महापालिका सभागृहाच्या निर्णयापर्यंत ‘जैसे थे’ व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात येईल. तसेच, यासंदर्भात सोलापूर महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त यांना आदेश देण्याचेही त्यांनी आश्वासन दिल्याने ६ जुलै २०२५ रोजी मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना घेराव घालण्याचा निर्णय रद्द करण्यात आल्याची माहिती ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी दिली. याची अंमलबजावणी करा ही मागणी घेऊन ठिय्या आंदोलन केले.
Leave a Reply