Dr. Babasaheb Deshmukh: घरात 60 वर्षे आमदारकी…पण गणपतराव देशमुखांच्या आमदार नातवाने जपला निःस्वार्थ समाजसेवेचा वारसा; दोन दिवस वारकरी सेवा
आषाढी वारीसाठी पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्याची सेवा करत डॉ. बाबासाहेब देशमुख आणि त्यांच्या पत्नी डॉ. निकिता देशमुख हे दांपत्य विठ्ठलाच्या चरणी आपली सेवा रुजू करत आहेत.
Solapur, 08 July : सांगोला मतदारसंघातून तब्बल अकरा वेळा विधानसभेवर निवडून गेलेले (स्व.) गणपतराव देशमुख हे राजकारणातील निःस्वार्थी आणि समाज सेवेसाठी वाहून घेतलेले ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व होते. तोच वारसा त्यांचे नातू आणि सांगोल्याचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख पुढे चालवत आहेत. आषाढी वारीसाठी पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्याची सेवा करत डॉ. बाबासाहेब देशमुख आणि त्यांच्या पत्नी डॉ. निकिता देशमुख हे दांपत्य विठ्ठलाच्या चरणी आपली सेवा रुजू करत आहेत. घरात तब्बल 60 वर्षे आमदारकी, स्वतः आमदार असूनही डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या साधेपणाची चर्चा वारीत होताना दिसून आली.
सांगोल्याच्या देशमुख घराण्याकडे तब्बल 12 वेळा आमदार आलेली आहे. स्वतः गणपतराव देशमुख (Ganpatrao Deshmukh) हे 11 वेळा सांगोल्यातून निवडून आले आहेत, या वेळी त्यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख हे सांगोल्यातून विधानसभेवर निवडून आहेत. एकदा निवडून आलेला नगरसेवकही भपकेबाजी आणि चमकोगिरीत कमी नसतो. पण तब्बल 60 वर्षे घरात आमदारकी असूनही सांगोल्याचे देशमुखांनी आपला साधेपणा जपला आहे.
Leave a Reply