पूर्व विभाग श्री हिंगुलांबिका देवी देवालय व आयकॉन कॉलेजच्या वतीने गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व सायकल वाटप
पूर्व विभाग श्री हिंगुलांबिका देवी देवालय व आयकॉन कॉलेज ऑफ फायर इंजीनियरिंग अँड सेफ्टी मॅनेजमेंट च्या संयुक्त विद्यमाने गुणवत्ता असूनही आर्थिक परिस्थिती मुळे कित्येक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित असतात त्यामुळे मागील तीन वर्षापासून हे उपक्रम हाती घेतलेले आहे .या कार्यक्रमाचे उद्घाटन सोलापूर शहर भाजपाचे अध्यक्षा सौ रोहिणीताई तडवळकर यांच्या शुभहस्ते झाले या समयी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर विकास मंच चे सदस्य उद्योगपती श्री केतनभाई शहा ,माजी नगरसेवक मेघनाथजी येमुल तसेच सोलापूर विकास मंचचे सदस्य करियर कौन्सिलर योगीन गुर्जर सर हे उपस्थित होते या कार्यक्रमास भावसार समाजाचे उपाध्यक्ष साई क्षीरसागर व राजू हिबारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली
या कार्यक्रमात गुणवंतांचे अभिनंदन करून भविष्यातील कारकिर्दी विषयी शुभेच्छा दिल्या व सामाजिक उपक्रमाचे कौतुक करताना आणखी जास्तीत जास्त गरजूंना लाभ कसे देता येईल याविषयी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले आहेत. पाच गरजू विद्यार्थिनींना दुचाकी सायकल व १५० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयकॉन कॉलेजचे संस्थापक प्राध्यापक श्री सत्यम दुधनकर यांनी केले तर आलेल्या मान्यवर पाहुण्यांचे, विद्यार्थी , पालक वर्गाचे तसेच मुख्यमंत्र्यांचा दौरा अर्धवट सोडून विनंतीस मान देऊन आलेल्या भाजप अध्यक्षा सौ रोहिणीताई तडवळकर यांचे विशेष आभार पूर्व विभाग श्री हिंगुलांबिका देवी देवालय चे अध्यक्ष विजय महिंद्रकर यांनी मानले
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता आयकॉन कॉलेजचे श्री रवी ,मुसळे सर तसेच त्यांची पूर्ण टीम यांनी सहकार्य केले.
Leave a Reply